उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती हे मराठा आरक्षणावर वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत???

0
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज रस्त्यांवर उतरला असताना आणि मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला असतानासुद्धा सरकार हे अकार्यक्षम पण दाखवत होत.पण त्यादिवशी झालेल्या मराठा बांधवांच्या भावनांच्या उद्रेकानंतर मराठ्यांनी थेट नेते,आमदार,पक्षाची कार्यालय याच्यावर हल्ला केला त्यांच्या गाड्या घरे जाळली आणि त्यानंतर सरकारला जाग आली आणि त्यानंतर त्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली त्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांचे अध्यक्ष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार,तसेच काँग्रेस नेते उपस्थित होते या बैठकीसाठी भाजप खासदार उयनराजे भोसले तसेच संभाजीराजे छत्रपती यांना पण आमंत्रण होते.पण या दोन्हीं राजेंनी या बैठकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे.
छत्रपती उदनराजे आणि संभाजीराजे हे मराठा आरक्षणाबाबतीत वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत अशा चर्चा सुरू झाल्या. स्वतः संभाजीराजे यांनी ट्विट करून सांगितले की ही बैठक बोगस स्वरूपाची आहे, मराठा समाजाकडून होत असणाऱ्या नेत्यांवरील हल्यामुळे आणि आपली व्होट बँक वाचवण्यासाठी अशा बैठका घेण्यात येत आहेत,ते यातून ठामपणे आरक्षणावर तोडगा काढत नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले आहे आणि त्यामुळे आपण बैठकीत अनुपस्थित राहिलो आसे सांगितले.महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी पण या बैठकीत पाठ फिरवली. उदयनराजे आणि संभाजीराजे यांची पुण्यात भेट. उदयनराजे आणि संभाजीराजे यांची पुण्यात भेट झाली त्यानंतर उदयनराजे माध्यमांशी बोलताना म्हणाले की यांना आरक्षण द्यावेच लागेल कारण समाजाकडून खूप प्रेशर आहे सरकारवर आणि नाही दिलं तर आम्ही बघतो काय निर्णय घ्यायचा ते. उदयनराजे आणि संभाजीराजे यांनी निर्णय घेतल्यानंतर मराठा समाज त्यांना कशाप्रकारे पाठींबा देईल हे कमेंट मध्ये सांगा.. एक मराठा लाख मराठा!!!

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)