एका तरुण शेतकऱ्याचा आक्रोश-ऐन दसऱ्यात माझ एकही फुल विकल गेलं नाही.याला सरकार जबाबदार आहे का?
ऑक्टोबर २५, २०२३
0
नमस्कार शेतकरी बंधूंनो,
मी जालन्यातील एक शेतकरी बरेच लोक भाषण ठोकताना बोलतात की शेतकऱ्याने शेतात काय पिकतं या पेक्षा बाजारात काय विकते हे समजून शेती केली पाहिजे.म्हणल मोठी माणस सांगतात ते एकावं आणि मी एक युवा शेतकरी त्याप्रमाणे शेती करायचा निर्णय घेतला आणि सणासुदीच्या दिवसात दसऱ्याला दिवाळीला लोकांना फुले लागतात मोठ्या प्रमाणावर दासऱ्यात फुलांच्या मार्केट ला तेजी असते हे मी ओळखल आणि पूर्ण लागवडीचे आणि मालं कधी निघणार याच गणित जुळून मी लागवड केली.
गणीताप्रमाने सगळ सुरळीत चालू होत.पण पाऊस पण कमी होता त्यावर पण मार्ग काढून मी पाण्याची सोय करून झाडं व्यवस्थित मोठी केली.त्याला वेळच्या वेळी खुरपणी केली, औषधे फवारली,आणि बरोबर वेळेत फुल यायला सुरवात झाली.बरोबर सणाच्या वेळी तोड येईल चांगला दर मिळेल म्हणून मी खुश होतो.माल पण चांगला होता घरची पण मला मदत करत होती.सगळ सुरळीत होत दसऱ्याच्या तीन दिवस आधी फुलांची तोड चालू केली घरची सगळी आणि बाहेरची काही माणसे लाऊन तोड पूर्ण केली. कॅरेट भरले मोठा टेम्पो ४०७ सांगितला होता.
आणि आता खेळ चालू झाला !!!!
गाडी भरली आणि मी आणि माझा मित्र पुण्याच्या मार्केट ला जायला निघालो पूर्ण दिवस प्रवासात गेला.दर चांगला मिळेल अशी अपेक्षा होती. मार्केट ला पोहोचलो व्यापाऱ्यांना भेटलो माल तर चांगलाच होता आपला पण हा एवढ्या लांबून गाडी घेऊन आलाय बघितल्यावर व्यापाऱ्यांनी दर पाडून मागायला सुरुवात केली कारण त्यांना माहित होत की हा माल घेऊन काय परत जाणार नाही. दर काय देत न्हवते मित्र म्हणाला आपण वाशीच्या मार्केट ला जाऊ मोठा मार्केट आहे.मग मी पण म्हणालो आलोय इथपर्यंत तर जाऊ आता.मग आम्ही गेलो तीसऱ्या दिवशी सकाळी पहाटे पोहोचलो. मार्केट फिरलो व्यापाऱ्यांना भेटलो तिथं पण तीच अवस्था होती एक तर आम्ही जेवलो पण न्हवतो,मालाला गिराईक येत न्हवते खूप वेळ थांबलो माल पण थोडा नरम होत चाललेला.काय करावं कळत न्हवत.
कष्ट आपण करायचं सगळ आपणं करायचं आणि किंमत ठरवायला दुसऱ्याकडे जायचं असा राग आलेला पण माल द्यायचा होता.शेवटी मी गाडी काढली हायवे ला आलो.आणि सगळे कॅरेट रस्त्याला ओतून दिले कारण दसरा झाला की कोण विचारणार न्हवते मालाला.घरातून तीन दिवांपूर्वीच निघालेलो उपाशी होतो,आणि रिकाम्या हातानी परत जाणार होतो. मला एक प्रश्न पडला की
आपण चुकलो कुठे? शेतकऱ्याची यात काय चुक?
सगळा खर्च,लागवड,औषधे,तोडणी, वाहतूक सगळा खर्च करून काय लागले हाताला?
आणि जे विकते तेच पिकवले होत! तर मग शेतकऱ्याचा माल नाशवंत म्हणून कोणीही कोणालाही वाटेल तसा दर लावणार का?
आणि याला सरकार जबाबदार आहे का ते पण सांगा?
कारण माझ्या मते माल बाहेरून आयात झाल्यामुळे दर पडले किंवा पाडण्यात आले.
माझे काय चुकले किंवा सरकार जबाबदार आहे का? याला हे कॉमेंट करून सांगा.आणि जास्त शेअर करा किमान एखादा सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत तरी पोहोचेल.किंवा यातून बाकीच्या शेतकऱ्यांना सुधा बोध मिळेल.
धन्यवाद!!