मराठा आरक्षण का? सांगा त्या नेत्याला जे विचारतात.

0
नमस्कार बंधूंनो मी एक मराठा मावळा, सर्वांना पहिल्यांदा जय शिवराय जय महाराष्ट्र. बंधूंनो या आधीच्या काळात मराठ्यांना आरक्षण न्हवते आता ही नाही पण गेल्या सात ते आठ वर्षात असे काय झाले की मराठा समाज आरक्षणासाठी जास्तच प्रयत्नशील झालंय आता तर पूर्ण ताकतीने लढा देण्याच्या तयारीत आहे.बांधवांनो आता परिस्थितीच अशी झालीय की मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे कारण प्रत्येक मराठा बांधवाला आयुष्यात एकदातरी आरक्षण नसल्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.मी माझ्या बाबतीत घडलेल्या काही गोष्टी तुम्हाला पण सांगतो आणि ही पोस्ट नेत्यांपर्यंत सरकारपर्यंत पोहोचली पाहिजे की जे विचारतात की मराठा आरक्षणाची गरज का? त्यांच्यापर्यंत शेअर करून पोचवा. मराठा आरक्षणाची गरज का? - त्याची कारणे सुरवातीच्या काळात मराठ्यांना जमिनी होत्या उदरनिर्वाह व्यवस्थित होत होता.पण आता कुटुंब मोठी झाली जमिनी तेवढ्याच राहिल्या महागाई वाढली आणि बाकीची लोक मुले त्यांची योग्यता नाही ते त्या पदावर जाऊन फुकटची पद भोगू लागले. मी कॉलेज ला असताना माझ्या वर्गातील एक जण चारचाकी घेऊन यायचा.मला प्रश्न पडला की याची परिस्थिती आपल्यासारखीच आहे पण हा चारचाकी गाडी घेऊन येतोय एकदा मी कॉलेज फी भरत असताना तो पण तेथे फी भरण्यासाठी आला होता. तेव्हा मी बघितले की त्याचं वर्गात त्याच कॉलेज ला शिकून मला इंजिनिअरिंग ला ८३००० फी होती आणि त्याला ७८०० फी होती.मी गोळाबेरीज केली तेव्हा समजल की याला ४ वर्षात जेवढी फी आहे त्यापेक्षा जास्त मला एका वर्षाची आहे.म्हणजे वाचलेल्या फी च्या जीवावरच हा गाडी किंवा ऐश मध्ये राहत होता.हे बघितल्यावर खूप दुःख झाले आणि आमचे काही मराठा शिक्षक सुधा टू व्हीलर वरून येत होते. दुसरा अनुभव - नोकरी मिळवताना पण रात्रंदिवस ग्रामीण भागातील पोर ऊन वारा पाऊस कशाचा विचार न करता शेतातील सगळे काम बघून अभ्यास आणि मैदानी चाचणी चा अभ्यास करतात आणि ८५ ते ९० मार्क पडूनही थोड्या मारकांसाठी सेलेक्शन होत नाही आणि कास्ट मधले ६५ मर्कला पण सिलेक्शन घेतात म्हंजे यात त्याची किंवा त्याच्या आईबापाची तरी काय चूक ते पण रात्रंदिवस शेतात कष्ट करून मुलाला पैसे पुरवतात.म्हणजे चूक मराठा समाजाचा असणे ही आहे का? आणि नुसते नोकरी मिळवण्यासाठी हे मर्यादित नाही तर नोकरीत प्रमोशन मध्येपन असच होत बघा. आता माझ्या मित्राचे वडील पोलिस खात्यात आहेत आणि त्यांच्याच बरोबर भरती झालेला एक वेगळ्या जातीमधील आहे त्याचे मागील ९ वर्षापूर्वीच प्रमोशन झाले आहे PSI साठी आणि मित्राच्या वडिलांचे आता रिटायरमेंट ला दोन वर्षे बाकी असताना प्रमोशन मिळाले.म्हणजे यात पण जातीची चूक का? म्हणून मी मराठा समाजाला आरक्षणाची गरज का? यावर लीहले आहे.आवडले असेल तर लाईक करा,यासारखा आणुभव आला असेल तर कॉमेंट मध्ये सांगा आणि जे मंत्री बोलतात ना मराठा आरक्षणाची गरज का ? त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा.म्हणजे त्यांना उत्तर समजेल आणि मराठा समाजाचा संयम काय आहे ते कळेल!!! धन्यवाद !!!

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)