टोमॅटो यशोगाथा
नमस्कार शेतकरी मित्रांनो आजकाल आपण पाहत आहात की टोमॅटो ने मार्केट मध्ये उच्चांकी भाव गाठले आहेत. यामुळे एकीकडे शेतकरी आनंदी आहे तर शहरातील लोक यामुळे संताप व्यक्त करत आहे. टोमॅटो ने उच्चांकी दर १६० ते १८० रुपये गाठला होता पण आता दर कमी झाले आहेत.
या कालावधीत काही टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी लाखो रुपये तर काही शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपये कमावले आहेत.आज आपण या पोस्टमध्ये अशाच एका कुटुंबविषयी माहिती बघणार आहोत जे की टोमॅटोतून कोट्याधीश झाले आहेत.
शेतकरी मित्रांनो ही गोष्ट आहे जुन्नरमधील गायकर कुटुंबाची. हे कुटुंब टोमॅटो शेतीतून करोपती झाले आहे. शेतकरी मित्रानो हे कुटुंब आहे पाचघर गावातील. पाचघर गाव हे पुणे आणि नगर जिल्याच्या सीमेवर आहे. या तालुक्यात बऱ्यापैकी अनेक धरणे आहेत. त्यामुळे ह्या गावाला वरदान मिळाले आहे. या गावात असलेली काळीभोर जमीन आणि असलेले वर्षभर पाणी त्यामुळे गावातील अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवड केली होती. आणि ह्याच टोमॅटो लागवडीमुळे गायकर कुटुंबाचे नशीब पालटले आहे.
शेतकऱ्याचे नाव आहे तुकाराम भागोजी गायकर. यांचे एकूण 18 एकर जमीन आहे त्यातील बारा एकरावर त्यांनी टोमॅटो लागवड केली होती. या कामात त्यांना त्यांच्या मुलाची आणि सुनेची साथ मिळाली होती. आणि टोमॅटो शेतीतून गायकर कुटुंबाचे नशीब पालटलं. नाहीतर कुटुंबाला टोमॅटोतून गेली तीन वर्षे खूप नुकसान झाले. यांचे गेल्या वर्षी शंभर ते दीडशे रुपये प्रमाणे एक कॅरेट अशी टोमॅटो विकले होते. त्यातून त्यांचा भांडवल खर्चही निघाला नव्हता. पण यावर्षी टोमॅटोला चांगला भाव मिळाल्यामुळे त्यांची गेल्या तीन वर्षांची नुकसान भरून निघाले आणि त्यांचा चांगला फायदा झाला. गायकर यांच्या शेतात 100 पेक्षा जास्त मजुरांना रोजगार मिळालेला आहे. नुकतच गायकर कुटुंबानी त्यांचा माल नारायणगाव मार्केटला पाठवला होता तिथे त्यांना 20 किलो साठी 2100 रुपये एवढा भाव मिळाला. त्यांना एकूण 900 कॅरेट मधून तब्बल वीस लाख एवढा भाव मिळाला तेही एका दिवसात. यंदाच्या वर्षी टोमॅटो ने अनेक शेतकऱ्यांना घसघशीत उत्पादन दिले आहे असे असा टोमॅटोला भाव इतिहासात पहिल्यांदाच मिळतोय असे व्यापारी सांगत होते.
आज शहरातील लोक टोमॅटोच्या भावमुळे कितीतरी ओरडत असतील तरी शेतकऱ्याला या अगोदरही कित्येकदा नुकसान भोगावे लागले आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या दृष्टीने ही एक आनंदाची गोष्ट आहे.