प्रधानमंत्री किसान संमेलन
नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 14 वा हप्ता एक अकरा वाजता साडेआठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्याचबरोबर आपल्या देशाचे मान्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधणार आहेत त्यामुळे आपण त्यांची सभा ऑनलाईन खाली लिंक वरून ठीक अकरा वाजता Join करा.
- सभा जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:https://pmindiawebcast.nic.in
देशाचे प्रधानमंत्री श्री. नरेंद्र भाई मोदी यांच्या संकल्पनेतून 2019 साली शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य मिळावे, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या 'पीएम किसान' योजनेच्या 14 व्या हप्त्याचे एका क्लिकवर थेट बँक खात्यावर वितरण होणार आहे व प्रधानमंत्री महोदयांचा शेतकऱ्यांशी संवाद होणार आहे.
हा 'किसान संमेलन' महासोहळा सीकर, राजस्थान येथे आज दि. 27 जुलै 2023 रोजी संपन्न होत असून, याद्वारे आपल्या खात्यात दोन हजार रुपये तर येतीलच, पण याचबरोबर आपण या समारंभास ऑनलाइन वेब लिंक द्वारे पाहू शकतो.
शेतकरी बांधवांनो, या सोहळ्यास खालील वेबलिंकद्वारे सहभागी होऊन या सोहळ्याच्या माध्यमातून प्रधानमंत्री श्री. नरेंद्र भाई मोदी यांच्या शेतकरी धोरणाचे साक्षीदार व्हा....
धन्यवाद...
• दिनांक 27 जुलै 2023 रोजी, सकाळी 11 : 00वा.