हवामान अंदाज : २५ जुलै
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक २५ जुलै ते २८ जुलै च्या दरम्यान महाराष्ट्राच्या काही जिल्यात मुसळधार पाऊस पडणार आहे असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सांगितलेला आहे.
आपल्याला माहिती आहे की पंजाबराव साहेब जुन्या माहितीचा अभ्यास करून अंदाज वर्तवत असतात आणि ते जवळपास सर्व अंदाज खरेही ठरतात. काल त्यांची पंढरपूर येथे सभा झाली होती जिथे त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्याना आनंदाची बातमी दिली.
🤳🏼JOIN WHATSAPP : https://chat.whatsapp.com/BSXkILKmPbzA63GsXRRhtR
- कुठल्या भागात पडणार मुसळधार पाऊस :
विदर्भ आणि मराठवाडा या भागात २५ जुलै ते ३० जुलै या कालावधीत या भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पंजाबराव डख साहेबानी दिली आहे.
- कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस :
- यवतमाळ
- वाशीम
- हिंगोली
- वर्धा
- नागपूर
- जालना
- परभणी
- धाराशिव
- नांदेड
- बीड
- अहमदनगर
- लातूर
- संभाजीनगर
या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे.तसेच राहिलेल्या इतर जिल्ह्यात काहीकाही भागात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
- सोलापूर:
काल पंढरपूर मध्ये झालेल्या सभेत पंजाबराव डख यांनी सोलापूर जिल्यातील शेतकऱ्यांना काल आनंदाची बातमी दिली.
त्यांच्या माहितीनुसार २५ जुलै ते २८ जुलै च्या दरम्यान सोलापूर जिल्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवली होती. आणि आज २५ जुलै रोजी सकाळपासून पावसाची चांगली सुरुवात सोलापुरात सुरू झालेली आहे.
- शेतकरी मित्रानो काही झालं तरी हा शेवटी अंदाज आहे वाऱ्याची दिशा बदलली की पाऊस पडण्याचे ठिकाण बदलते.