आंबा लागवड अनुदान योजना
JOIN WHATSAPP : https://chat.whatsapp.com/BSXkILKmPbzA63GsXRRhtR
नमस्कार शेतकरी मित्रानो आपण शेतीविषयी नवनवीन योजना बघत असतो जसे की
ठिबक सिंचन अनुदान योजना , कडबाकुट्टी अनुदान योजना याचबरोबर मागेल त्याला शेततळे योजना अशा नवनविन शेतीसंबंधी योजना आपण बघत असतो.
याचबरोबर आपण शेतीला लागणारी नवनवीन आधुनिक यंत्राबद्दल देखील माहिती बघत असतो जसे की मानवचलीत खत पेरणी यंत्र , सोयाबीन टोकण यंत्र असेल यांसारख्या यंत्रविषयी माहिती बघत असतो. आज आपण आंबा लागवडीसाठी जे सरकारकडून अनुदान मिळते याविषयी माहिती बघनफ आहोत.
अनुदानासाठी अर्ज कुठे करायचा , अनुदानासाठी अर्ज कसा करायचा , अनुदानासाठी आवश्यक काय कागदपत्रे आहेत याचबरोबर अनुदान किती मिळणार याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण या पोस्टमध्ये बघणार आहोत.
- किती योजनेत अनुदान दिले जाते :
आंबा लागवडीसाठी तीन योजनेत अनुदान दिले जाते ते खालील प्रमाणे..
- MNREGA (मनरेगा)
- एकात्मिक फलोत्पादन
- भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड अनुदान योजना
आज आपण एकात्मिक फलोत्पादन आणि भाऊसाहेब फुंडकर फळबाग अनुदान योजना यातून अनुदान कसे घ्यायचे त्याबद्दल माहिती बघणार आहोत.
- अनुदानासाठी अर्ज कसा करायचा :
मित्रांनो या योजनेविषयी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला महाडीबीटी फार्मर पोर्टल वर जाऊन लॉगिन करायचं जर आपले महाडीबीटीवर खाताना असेल खालील पोस्टवर क्लिक करून प्रथम आपले महाडीबीटी पोर्टलवर खाते बनवून घ्या.
महा- डीबीटी फार्मर रेजिस्ट्रेशन : https://www.krushidut.com/2023/06/MAHA-DBT-FARMER-REGISTRATION.html
महा-डीबीटी फार्मर : https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login
महा-डीबीटी फार्मर वर गेल्यावर आपल्याला आधार नंबर टाकून त्यावर येणारा OTP टाकून लॉगिन करा.
आता आपल्याला अर्ज करण्यासाठी आपली प्रोफाइल १००% पूर्ण असणे गरचे आहे.त्यामुळे पहिल्यांदा लॉगिन केल्यावर आपली प्रोफाइल १००% पूर्ण करून घ्या. प्रोफाइल पूर्ण झाल्यावर मुख्य पानावर आपल्याला अर्ज करा असा पर्याय दिसेल. आपल्याला त्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर तुम्हाला ३ पर्याय दिसतील..
- कृषी यांत्रिकीकरण
- सिंचन साधने व सुविधा
- फलोत्पादन
आपल्याला आंबा लागवडीसाठी अनुदान घ्यायचे असल्यामुळे आपण फलोत्पादन यासमोरील पर्यायावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक फॉर्म ओपन होईल त्यात आपल्याला आपले गाव त्याचबरोबर तालुका निवडायचं आहे.
त्यानंतर घटक प्रकारावर क्लिक केल्यानंतर आपल्या तीन पर्याय दाखवतात त्यामधील आपल्याला इतर घटक हा पर्याय निवडायचं आहे. त्यानंतर बाब निवडायची आहे त्यात आपल्याला वेगवेगळ्या बाबी दाखवल्या जातात त्यामधील आपल्याला बाग लागवड ही बाब निवडायची आहे. घटक निवड च्या खाली आपल्याला बाब निवड हा दुसरा पर्याय दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला फळपिके हा पर्याय निवडायचं आहे.
- योजना निवडा :
योजना निवडा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली दोन प्रकारच्या योजना दिसतील..
- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत ज्या शेतकऱ्या कडे पाच एकर पेक्षा जास्त क्षेत्र आहे त्यांना अनुदानाचा लाभ दिला जातो. त्यामुळे जास्त शेतकऱ्याकडे पाच एकरापेक्षा किंवा दोन हेक्टर पेक्षा जास्त जमीन असेल त्यांनी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना या योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ घ्यायचा आहे आणि आपण जर अल्प किंवा अत्यल्प भूधारक शेतकरी असा तर आपण एकात्मिक फलत्पादन विकास अभियान ही योजना निवडायची आहे.
पीक निवडा या पर्यायात आपण आंबा पिके निवडायचा आहे. लागवडीचा प्रकार यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला दोन पर्याय दिसतील त्यामधील एक ठिबक सिंचन संचाशिवाय आणि ठिबक सिंचन संचासह असे दोन पर्याय दिसतील म्हणजे आपण ठिबक सिंचना बरोबरही लागवड करणारा किंवा ठिबक सिंचन रहित ही लागवड करणार आहात यानुसार पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर पिकामधील अंतर आपल्याला निवडा जायचे असेल की दहा बाय दहा मीटर असेल किंवा अडीच बाय अडीच मीटर असेल किंवा तीन बाय सहा मीटर असेल तर आहे ते आपण निवडायचे आहे. त्यानंतर आपण फळबाग लागवडीसाठी किती क्षेत्र लावणार आहात त्यानुसार आपले क्षेत्र खाली निवडायचे आहे. शेवटी जतन करा असा पर्याय निवडायचा आहे.
शेतकरी मित्रांनो यात आपण आता सध्या नुसती बाब निवडले आहे अर्ज अजून सादर केलेला नाही. आपल्याला अर्ज सादर करण्यासाठी वरच्या कोपऱ्यात अर्ज सादर करा असा पर्याय दिसेल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपण जेवढ्या बाबी सादर केलेले आहेत त्यामधील आपल्याला जी बाब पाहिजे आहे त्याला एक , दोन , तीन असे अनुक्रमे नंबर द्यायचे आहेत आणि अटी व शर्ती सर्व मान्य आहेत यावर क्लिक करून अर्ज सादर करा यावर क्लिक करायचे आहे. अर्ज करा यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला 23 रुपये 60 पैसे एवढी रक्कम मागितली जाईल ती आपण यूपीआय द्वारे किंवा कोणत्याही दुसऱ्या पद्धतीने पेमेंट करायचे आहे. यानंतर आपल्याला मी अर्ज केलेल्या बाबी यामध्ये तुमचा अर्ज दिसेल. अर्जाची मंजुरी झाल्यानंतर तुम्हाला winner असा पर्याय दाखवेल त्यानंतर तुम्हाला आवश्यक ती कागदपत्रे मागितली जातील ती कागदपत्रे जमा केल्यानंतर तुम्ही पुढील फळबाग लागवडीची प्रक्रिया करायचे आहे.