कडबाकुट्टी अनुदान योजना
JOIN WHATSAPP 👉🏻 https://chat.whatsapp.com
YOUTUBE 👉🏻 आधुनिक शेतीचा गोडवा
नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण शेती संबधित अनेक योजना बघत असतो जसे की मागेल त्याला शेततळे योजना असेल तसेच PM किसान योजना असेल यासोबत आपण अनेक शेतीसंबंधी निगडित यंत्राविषयी माहिती बघत असतो जसे की मानवचलीत पेरणी यंत्र असेल अनेक अशी यंत्राची माहिती बघितवई आहे.
तर आज कडबा कुट्टी अनुदान योजना, कडबा कुट्टी चे प्रकार, कडबा कुट्टी साठी दिले जाणारे अनुदान याचा ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करायचा , कडबा कुट्टीच्या अनुदानासाठी ट्रॅक्टरचा आरसी बुक लागतात का? या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आपण या पोस्टमध्ये बघणार आहोत. कडबाकुट्टी ही दोन प्रकारात दिली जाते एक तर मनुष्याचे चलीत कडबा कुट्टी आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे ट्रॅक्टरचलित इलेक्ट्रिक कडबा कुट्टी या दोन प्रकारांमध्ये कडबकुट्टी चे वर्गीकरण करण्यात आलेले आहेत.
- कडबाकुट्टी अनुदान किती मिळणार ?
मनुष्यचलीत कडबाकुट्टीला अनुदान हे किमतीच्या ५०% किंवा जास्तीत जास्त दहा हजार यापैकी जे कमी असेल ते अनुदान दिल जात अर्थात तुम्हाला जर 8000 ची तुम्ही कडबा कुट्टी घेतली तर मिळणारा अनुदान हे चार हजार रुपये असत आणि कडबा कुट्टी जर तुम्ही 20000 पेक्षा जास्त किमतीची घेतली तर हे जास्तीत जास्त दहा हजार मिळेल 22000 असेल तर जास्त दहा हजार मिळेल याचाच अर्थ जास्तीत जास्त दहा हजार किंवा 50% यापैकी जी कमी असेल ती रक्कम शेतकऱ्याला अनुदान मिळून मिळते. मग ते 4000 असेल 6000 असेल किंवा जास्तीत जास्त जर असेल म्हणजे ट्रॅक्टरचलित इलेक्ट्रिक कडबा कुट्टी तीन एचपी पाच एचपी त्याच्या वेगवेगळ्या प्रकार आहेत याच्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर किंमतीच्या 50% किंवा जास्तीत जास्त वीस हजार मिळतं म्हणजे कडबा कुट्टी ची किंमत जर तुमच्या चाळीस हजारापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला मिळणारा अनुदान हे जास्तीत जास्त वीस हजार असेल पण तुम्ही इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे ती जर तुम्ही 18000 ची घेतली तर मात्र तुम्हाला अनुदान 9000 च मिळेल म्हणजे किमतीच्या 50% किंवा 20,000 यापैकी जी रक्कम कमी असेल ती याच्यामध्ये अनुदान म्हणून दिली जाते .
मित्रांनो मनुष्यचलीत कडबकुट्टी साठी ट्रॅक्टर असणे आवश्यक नाही . पण मित्रांनो ट्रॅक्टरचालीत कडबाकुट्टीचा लाभ घेताना ट्रॅक्टरचा आरसी बुक जोडणे बंधनकारक असेल तुमच्या नावावरती ट्रॅक्टर असावा किंवा तुमच्या कुटुंबातील लाभार्थ्याच्या जे तुमचे नातेवाईक असतील त्यांच्या नावावरती ट्रॅक्टर असावा अशा प्रकारचे एक प्रकारची अट आहे आणि ते आरसी बुक तुम्हाला कागदपत्र सोबत जोडावे लागणार आहे.
- कडबकुट्टी अनुदान अर्ज कसा करायचा :
कडबाकुट्टी अनुदानासाठी सरकारच्या official वेबसाईट महा-DBT FARMER पोर्टलवर जाऊन रेजिस्ट्रेशन करायचं आहे. रेजिस्ट्रेशन करण्यासाठी आधार नंबर टाकून OTP टाकून रेजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर आपली प्रोफाइल १००% पूर्ण करून घ्यायची आहे जर अपूर्ण असेल तर ती पहिला पूर्ण करायची आहे त्याशिवाय योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- त्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या योजनेसाठी अर्ज करा असे दिसेल तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे.
- अर्ज करा वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दाखवल्या जातील जसे की कृषी यांत्रिकीकरण,सिंचन साधने आणि सुविधा याचबरोबर एकात्मिक फलोउत्पादन असेल यासारख्या गोष्टी दाखवल्या जातात.
- कडबा कुट्टी अनुदानासाठी आपल्याला कृषी यांत्रिकीकरणावर क्लिक करायचं आहे.
- क्लिक केल्यावर आपल्याला वेगवेगळ्या बाबी दिसतील जसे की मुख्य घटक,तपशील, hp श्रेणी याचबरोबर मशीनचा प्रकार आणि यंत्रसामग्री अवजारे आशा गोष्टी समोर येतील.
- मुख्य घटक : कृषी यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्थसहायय
- तपशील: मनुष्य चलित औजारे (मानवचलीत कडबा कुट्टीसाठी) जर ट्रॅक्टर चलित इलेक्ट्रिक कडबा कुट्टी घ्यायची असेल तर तास पर्याय निवडायचं आहे.
- यंत्रसामग्री : फॉरेज ग्रास निवडायचं.
- मशीनचा प्रकार : चाफ कटर
- तपशील : ट्रॅक्टर/पॉवर टीलर चलित औजारे
- HP श्रेणी : २० पेक्षा जास्त ते ३५ BHP
- यंत्रसामग्री : फॉरेज ग्रास कटर
- मशीनचा प्रकार : चाफा कटर ( ३ ते ५ HP इलेक्ट्रिक)
- आवश्यक कागदपत्रे :
- लाभार्त्याचे आधार कार्ड
- आधार नंबर बँक ला लिंक असायला हवा.
- ७/१२ उतारा
- ८अ उतारा
- अर्जदाराकडे १० एकरपेक्षा कमी जमीन असणे आवश्यक आहे.